Tuesday, September 8, 2009

शब्दांच्या पलीकडले!

कानात शिरत नाही का? बहिरा आहेस का? कानपुर में हरताल है क्या? ही वाक्य आपण येता जाता किती सहजपणे एखाद्याला बोलत असतो.

शनिवारी मात्र मी काही वेळासाठी का होई ना ह्या जगात प्रत्यक्ष प्रवेश केला. जव्हार ला प्रगति प्रतिष्ठान तर्फे चालवली जाणारी मूक बधिर विद्यार्थ्यांची शाळा आहे. वसतिगृह सुद्धा आहे. ही मूल अतिशय गरीब वर्गातली. आदिवासी पाड्यांमधली! आज पर्यंत कधीही आली नव्हती त्या आयुष्याची कल्पना! वास्तव. तिथली मूल जवळून पाहिल्यावर लक्षात आल की नशीबवान म्हणतात ते काय असत!

घरात टीवी वर गरिबीची, अशा अपंगांच्या शाळेचि चित्र बघून किंवा एखादी documentry बघून नाही कल्पना येवू शकत त्या जगाची. ती मूलं, त्यांना घडवणारे शिक्षक, त्यांची परिस्थिति, हे सगळं मुम्बइच्या चकचकीत सुखलोलुप सोन्याच्या पिंजर्यात बसून नाहीच समजू शकत कधी!

ह्यामुलांच आयुष्य म्हणजे निव्वळ अंधार. घरात पोटाला अन्न नाही. घालायला कपडा नाही. कानावर पडणारा प्रत्येक ध्वनि म्हणजे दगड फ़क्त. शाळा, डॉक्टर, ह्या गोष्टी म्हणजे luxuries, त्याही फाइव स्टार म्हणाव्या अशा. 

त्या अंधारात दिवा घेवून काही जगावेगळी ‘माणसं’ उभी आहेत. जन्म घेवूनही ज्यांना भविष्यच नव्हत अशांच्या आयुष्यात स्वप्न पेरू बघणारी.  

ह्य मुलानी आमच्यासमोर आदिवासी तारपा नृत्य सादर केल. कानावर सुर ताल काही पडत नसताना! एकही मूल चुकल नाही. संगीत असावं तर असं.

‘भाषा’  ह्या शब्दच अर्थ काय हे समजायचं असेल तर ह्या शब्दाशिवायच्या दुनियेत जावून यावं. माझी

दिड वर्षाची मुलगी त्यांच्या वर्गात जावून बसली. त्यांच्याबरोबर चित्र काढायला. त्यांच्याशी ती आणि ते तिच्याशी कुठल्या भाषेत बोलत होते हे ठावूक नाही. त्या वेळचा तिचा निष्पाप, कुठलेही ‘संस्कार’ न झालेला चेहरा, आणि मन, एखद्या कुपित बंद करून जपून ठेवावसं वाटलं मला. सहानुभूति दाखवण्यापेक्षा त्याना हे असं सहज आपल्या जगात सामावून घेण जास्त कठिण.

भाषा येणारे शब्दांना महाग, आणि शब्द सोडून बाकी सगळ्या भाषा जाणणारे हे खरे भाषा पंडित.

[Via http://sonalwaikul.wordpress.com]

No comments:

Post a Comment